Tujhyasathi

We are in the age where loneliness prevails amidst the crowds. Even when you are surrounded by a lot of people, you might feel awfully lonely due to circumstances.
But always remember! There is someone who cares for you!
This song is dedicated to that one amazing friend who always has your back and is eternally ready to pull you away from any deep dark tunnel!

I just had the concept of ‘being there for you’ or ‘तुझ्यासाठी’ in my mind for this song and I built the tune around the feel in my heart. Aai has written beautifully heartwarming lyrics which are intense yet so natural.
Sasmit Rudra’s piano has created an exceptional vibe for this song!

This is not a song for me but a feeling!
I want to spread the feeling that ‘someone always cares for you’, so always remember that someone and stay calm!

Enjoy this simple yet heartfelt feeling and please do share with your loved ones

Lyrics : Sadhana Rajhans Tembhekar
Piano : Sasmit Rudra

Guitars in unplugged : Radhika Anturkar
Music and Vocals : Saee Tembhekar

You can listen to this song on your favourite platform and use them in your Instagram and Facebook Stories.

Watch full original song on youtube : https://youtu.be/D4ZNv4tYW7E
Listen on your favourite platform https://smarturl.it/tujhyasathi

सध्याच्या युगात आपल्याला गर्दीतदेखील एकटं वाटावं अशीच स्थिती अवतीभोवती आहे.पण नेहमी लक्षात ठेवा,कुठेतरी अशी कुणीतरी एक व्यक्ति आहे जी तुमची खूप काळजी करते..!!

हे गाणं अशा व्यक्तीला समर्पित आहे, जी व्यक्ती, कुठल्याही परिस्थितीत सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते..!!

सदैव तुझ्यासाठी असं म्हणणार्‍या व्यक्तीसाठी आपण गाणं करावं, अशी कल्पना मनात आली आणि मी माझ्या मनातल्या या भावनेतून, एक चाल बांधली. माझ्या आईने, साधना राजहंस टेंभेकरने, अतिशय समर्पक अशी गीतरचना केली. या गाण्यातल्या सस्मित रुद्रच्या पियानो मुळे, ते भाव जास्त प्रभावी झाले आहेत.

माझ्यासाठी हे एक गाणं नसून उत्कट भावना आहेत. या गाण्याच्या माध्यमातून, मला आपल्याला हा विश्वास द्यायचा आहे, की, कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असलेली एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते.. तिच्या, तुमच्याप्रती भावना व्यक्त करणारं हे गाणं…!!

आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्मरण करून, या गाण्याचा आनंद घ्या आणि आपल्या प्रियजनांसोबत हे गाणं शेयर करा.

गीतकार : साधना राजहंस टेंभेकर
पियानो : सस्मित रुद्र
संगीतकार आणि गायिका : सई टेंभेकर

हे गाणं आपल्या आवडीच्या म्युझिक प्लॅटफॉर्मवरर ऐकू शकता आणि आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम स्टोरीत वापरू शकता. धन्यवाद..🙏🏻🙏🏻

Watch on youtube : https://youtu.be/D4ZNv4tYW7E
Listen on your favourite platform https://smarturl.it/tujhyasathi

उदासीनता कधी वाटली ही तुला
हाक एक ती तू देशील जर का मला
मनाचे मनाशी हे नाते असे निर्मळ
धावेन मी असे सत्वर तुझ्यासाठी
मी तुझ्यासाठी मी सदा

मेघ हे काळे जे दाटून आले
तुझ्या या निळ्या अंबरी
मन हे तुझे दुखावे कुणी वा
घायाळ हो तू अंतरी
क्षण सारे ते हे आनंदी
पुलकित आणि स्वछंदी
भरून आणीन तुझ्या जीवनी , मी तुझ्यासाठी , मी सदा

कधी वाटले रे तुजला एकाकी
निराधार ही वाटले
टोकास पाऊल ठेविले असता
तू आठव मजला त्वरे
समजेन मी ती कारणे
उमजेन मी ते हारणे
सोडवू मिळवून सारी कोडी , तुझ्यासाठी

Leave a Reply