
Saee Tembhekar, a seasoned Indian singer songwriter & vocalist with over two decades of experience, began performing publicly at the age of 6. Trained in Hindustani Classical music, she has earned multiple state and national accolades, drawing praise from esteemed musicians and global audience. A finalist on Zee Marathi’s Saregamapa, Saee is widely recognized for her songs in Mumbai Pune Mumbai 3 and title tracks for Lalit 205 and Thipkyanchi Rangoli on Star Pravah. With a Management Finance degree, she merges her academic acumen with her creative pursuits. Since 2020, Saee has made a mark in the Marathi indie music scene, with her music featured on platforms like Spotify, Apple Music, and her YouTube channel, which showcases rare unplugged versions of Marathi and Hindi songs, along with unique musical experiments and collaborations. Her international projects, including collaborations with Grammy-winning artists like KC Porter, highlight her expanding musical footprint. She has written and composed for the first-of-its-kind Marathi Audio Web Series, marking a new creative milestone. With a mix of soulful originals and timeless classics, Saee’s solo concert, Simply Saee, is a much-loved musical experience.
सई टेंभेकर गेल्या २० वर्षांपासून सुगम संगीत क्षेत्रात गायिका म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षातील तिचा प्रवास आपल्यापैकी अनेक लोकांनी अनुभवला असेलच, मग तो टीव्ही वरील विविध रियलिटी शो, देश-विदेशातील कार्यक्रम, चित्रपट व दैनंदिन मालिकांचे टायटल साँग्स ते आता, तिने स्वतः रचलेल्या गाण्यांमार्फत आपल्यापर्यंत पोचला आहे. अनेकांना सई आठवत असेल ती सारेगामप मराठी मधील फायनलिस्ट म्हणून किंवा मुंबई-पुणे-मुंबई ३ मधील “कुणी येणार गं” ह्या गाण्यामुळे किंवा “ठिपक्यांची रांगोळी” मालिकेच्या शीर्षक गीतामुळे. संगीताला प्राधान्य देऊन सईने एमबीए (फायनान्स) ची पदवी सुध्दा मिळवली आहे व त्याचा पुरेपूर उपयोग ती आज तिच्या सांगितिक वाटचालीत करते आहे. आज तिच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलमुळे सई टेंभेकर हे नाव भारतात आणि भारताबाहेर लाखो लोकांपर्यंत पोचलंय आणि ही सगळी मंडळी तिच्या चॅनेल वर नवनवीन गाण्यांची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. सईने गेल्या २-३ वर्षात अनेक मराठी व हिंदी गाणी स्वतः लिहून संगीतबद्ध करुन निरनिराळ्या माध्यमांवरुन प्रसिद्ध केली आहेत. तुम्ही ह्याचा आस्वाद यूट्यूब, स्पॉटिफाय, ऍपल म्युझिक ह्या चॅनल्स वर घेऊ शकता.